सार्वजनिक सुट्ट्या
पहा नवीन अपडेट
13 March 2020
08 March 2020
8 मार्च जागतिक महिला दिन
स्त्रीमध्ये जिद्द असल्यास, तिच्या इच्छाशक्तीच्या बळवर ती तिची क्षमता वाढवत स्वतःच्या पायावर उभी राहून आभाळ कवेत घेऊ शकते. हे मी अनुभवलेलं वास्तव आहे. स्त्रीही निसर्गाची फार मोठी उपलब्धी आहे. स्त्रीच्या प्रबळ इच्छाशक्तीपुढे कोणताही अडथळा तिला रोखू शकत नाही. तिच्यात वैचारीक सौंदर्य असल्यास ती अधिकच शोभीवंत असते. त्यातूनच तिचे सामर्थ्य वाढत जाते. त्या सामर्थ्याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण आहेत, राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, इंदिरा गांधी, मदर तेरेसा वगैरे वगैरे.
सामान्य स्त्रिया, घरोघरी, निष्ठेने आपल्या सामर्थ्यावर, कर्तृत्वावर प्रपंचाचा गाडा यशस्वीपणे हाकत असतात. तिथे समाज कष्टाने आणि निष्ठेने जगत असतो. तेव्हा प्रगतीचे बीजारोपण होते. आर्थिक सुधारणा गतीमान होतात. तेव्हा अनेक मानसन्मानाचे क्षण आपोआप वाट्याला येतात. कारण तिच्या सामर्थ्याची दखल कुटुंब, समाज,शासन घेत असतो. असे दखलपात्र होण्यासाठी स्त्रिचे प्रामाणिक कष्टचं कारणीभूत ठरतात.
आर्थिक व सामाजिक विषमता घालवायची असेल तर प्रथमतः सामान्य स्त्रिमधील अंधश्रद्धा घालवली पाहिजे. देवपुजेतून स्त्रि मुक्त केली पाहिजे. देवाची भिती स्त्रिच्या रोमारोमात भिनलेली आहे. कोणतेही संकट आले की, स्त्रि प्रथम देवाचा धावा करते. नवस बोलते- ते नवस फेडण्यासाठी, कुटुंबाला वेटीस धरते. कष्टाने कमवलेले पैसे नवस फेडण्यात खर्च करते. मग लेकराबाळांच्या शिक्षणावर, आरोग्यावर खर्च करण्यासाठी पैसे उरत नाहीत.
सावित्रीच्या लेकी म्हणवून घेणार्या स्त्रिया म्हणजे सद्याच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील असंख्य शिक्षिका गळ्यात कवडयांची माळ व हातात परडी घेऊन देवीला बोललेला नवस फेडण्यासाठी जोगवा मागतात. मुलीचं लग्न जमण्यासाठी ज्योतीषाचे उंबरठे झिजवतात. घरादारांच्या चौकटीला नाल ठोकतात. जीप, कार आदीला लिंबू, बिबवा, कातड्याचा तुकडा जोडलेलं (माळ) बांधतात.
देव, स्त्रि मुक्ती व स्त्रि विकासातील फार मोठी बाधा आहे. देव, देवळे हे चुका लपविण्याचे एक फार मोठं ठिकाण आहे. भोळ्या भाबड्या समाजाला लुटणारी जुगार्यांचे अड्डे आहेत. पवित्र स्थळांच्या नावाखाली स्त्रीयांचे शोषण करणार्या धर्मांधाच्या पेढ्या आहेत. हे समाजापूढे प्रकर्षाने आलं पाहिजे. हे फक्त स्त्री देव मुक्त झाल्याशिवाय शक्य नाही. स्वातंत्र्यानंतर लगेच ग्रामीण भागात साखर उद्योगाच्या माध्यमातून सामान्य अशिक्षित माणूस अवाढव्य यंत्राच्या सान्निध्यात आला. अल्पशिक्षित तेथील कामगार झाला. तसा तो देवभोळाच. कामाच्या जाग्यावर देवदेवतांचे फोटो लावू लागला. त्या फोटोला अगरबत्ती लावून हात जोडून कामाला सुरुवात करु लागला. असं का काय लागला ? कारण तेथील अपघात टाळण्यास देव सहाय्यभूत होईल, ही भाबडी अपेक्षा मनी ठेवून मनातील भिती घालविण्यासाठी. तसेच तेथील संस्था, कारखाना चालक कामगारांच्या मुलांच्या शाळेसमोरच मंदीर बांधू लागला. उच्च दर्जाचे बांधकाम साहित्य शाळेऐवजी मंदीरासाठी वापरले गेले. शाळा पडक्या पत्र्याच्या अन् मंदीर चकाचक्क सुरक्षित.
औद्योगीकरण झाले तरी माणूस तोच राहिला, बदलला नाही. आज सर्वकाही जगण्याची साधनं संगणकीकृत झाली आहेत. तरीपण तेथे देवदेवतांवरच जास्त भरोसा आहे. स्त्री जीवनाची कार्य मर्यादाही प्रजनन, उपभोग व श्रम अशी ठेवली गेली. ती अद्याप कायम आहे. काही स्त्रीया शिकल्या, नोकरी करु लागल्या. कार्यालयातून, लेखणी किंवा माऊस बाजूला करुन घरी आल्या की हातात झाडूच घेतात. सकाळी उठल्याबरोबर दारातील झाडून काढणे, सडा टाकणे, रांगोळी घालणे एवढे उद्योग करुन स्वयंपाक करुनच स्त्री शाळेला, कार्यालयाला जाते. म्हणजे तीचे श्रम चुकत नाहीत. या व्यवस्थित महानगरात बदल झाला असेल पण तोही अल्प प्रमाणात. पण आपल्याकडे जिल्हापातळीपासून गाव पातळीवर नोकरदार स्त्रीच सर्व करते हे स्पष्ट चित्र आहे.
स्त्री देव मुक्त करण्यासाठी समाज रचना बदलावी लागेल. त्यासाठी स्त्री-पुरुष सबंधात सुधारणा कराव्या लागतील. पुनर्रुत्पादन व उत्पादन याबाबी स्त्रीच्या मुक्तीतील अडथळे आहेत? याच्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.
जेव्हा स्त्री सुन होऊन नव्या घरात प्रवेश करते, तेव्हा तिच्याकडून त्या घरातल्यांच्या काय अपेक्षा असतात हे सर्वश्रुत आहे. त्या अपेक्षांची पुर्तता न करु शकल्यास पुढे काय होते ? हे ही आपण पहातोच. त्यातू दुर्घटना उद्भवतात. अनेक कटु प्रसंग घडतात. तरी स्त्री अनेक नको त्या भानगडीना तोंड देत जगते. उभी रहाते. त्या नव्या घरात स्वतःच अस्तित्व निर्माण करते. कारण ती सोशिक असते. इतके अन्याय पुरुषावर झाल्यास तो किती काळ टिकेल? केवळ सोशिक हा स्त्रीचा गुणधर्म असल्यामुळेच समाज रचनेत स्त्रीने पुरुषाच्या घरी जाणे हे सुत्र निवडले असावे. त्या सुत्रावरच आजपर्यंत मानव समाज विसंबून वाटचाल करत आहे.
आपल्याकडे पूर्वी एखादी सामान्य घटना म्हणजे घरजावाई होणे. कारण त्या स्त्रीला भाऊ नसायचा आणि काही जमीन जायदात असायची. तेव्हा तो पुरुष त्या स्त्रीच्या आईवडिलांच्या घरी रहायला जायचा. म्हणून तो स्त्रीचे कामे करत नसायचा. आजही करत नाही. तर तो सासर्याच्या दौलतीवर शानशौक करायचा. त्यामुळे तेथेही स्त्रिचीच कुचंबना व्हायची. तो पुरुषप्रधान व्यवस्थेचा परिणाम. बाकी काही नाही.
तर समाज रचना बदलायची म्हणजे काय ? तर पुरुष प्रधान व्यवस्थेत बदल अपेक्षित आहे. शिक्षणामुळे तो काही प्रमाणात होत ही आहे. पण तेथेही देव आणि अंधश्रद्धेचा अडथळा आहे. त्यासाठी नवीन समाज रचनेत देव, धर्म, जात,पूजा आदी बाबी नसल्या पाहिजेत. देवमुक्त स्त्रीया निर्माण झाल्या पाहिजेत, तरच नवीन समाज रचना शक्य होईल.
हा विषय एवढा साधा सोपा नाही. यावर विद्वानांना खूप अभ्यास करावा लागेल. यासाठी मध्यम वर्गाला प्रोत्साहीत करावे लागेल. कारण ही प्रक्रिया क्रांतीतूनच शक्य होऊ शकते. मध्यमवर्गातच क्रांतीची बीज असतात, हे इतिहास सांगतो.
30 December 2019
शैक्षणिक गुणवत्ता शिक्षक व पालकांची भूमिका या विषयावर शोधनिबंध सादर करताना - मुख्याध्यापक देविदास कोरे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ, पुणे संलग्न वर्धा मुख्याध्यापक संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 59 व्या राज्यस्तरीय संम्मेलनात शैक्षणिक गुणवत्ता शिक्षक व पालकांची भूमिका या विषयावर शोधनिबंध सादर करताना सिंदीजवळगा ता. निलंगा जि. लातूर येथील जयहिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक देविदास कोरे विचारमंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. रावसाहेब आवारी पुणे, राज्याध्यक्ष मारोती खेडेकर नागपूर, राज्य उपाध्यक्ष मोहन पाटील सोनवणे औरंगाबाद, माजी राज्याध्यक्ष वसंतराव पाटील लातूर, संमेलनाध्यक्ष दीपक दोंदल यवतमाळ, औरंगाबाद विभाग अध्यक्ष युनूस पटेल, सचिव दिलीप धुमाळ, विदर्भ विभाग अध्यक्ष शत्रूघन बिरकड, सचिव सतीश जगताप, पक्षिचिम महाराष्ट्र अध्यक्ष भागचंद औताडे अहमदनगर, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते वेदप्रकाश मिश्रा व इतर अनेक मान्यवर....
04 December 2019
ASHA: ज्ञानरचनावाद म्हणजे काय ?
ASHA: ज्ञानरचनावाद म्हणजे काय ?: ज्ञानरचनावाद म्हणजे काय ? अलीकडे ज्ञानरचनावाद हा शब्द शिक्षणप्रक्रियेत अनेक वेळा वापरला जात आहे .हा ज्...
25 August 2018
07 March 2018
यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम आवश्यक
- मुख्याध्यापक देविदास कोरे
निलंगा:-
कोणत्याही क्षेत्रात आपले ध्येय गाठून यश मिळवायचे असेल तर त्यासाठी अभ्यासातील सातत्य चिकाटी, वेळेचा सदुपयोग, सकारात्मक वृत्ती व कठोर परिश्रमाची आवश्यकता असते. असे मत मुख्याध्यापक देविदास कोरे यांनी सोनखेड ता. निलंगा येथील चन्नबसवेश्वर विद्यालयाच्या तेवीसावा वर्धापन दिन व दहावी विद्यार्थी निरोपसमारंभा निमित्त सहवीस फेब्रुवारी सोमवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव गव्हाणे, शाळेचे मुख्याध्यापक विश्वास मोरलवार जिल्हा परिषद प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक बी. एम. पाटील, एस. के. स्वामी, शिवाजी भोसले, व्ही. टी. पाटील, एस. एन. सूर्यवंशी, एस. सी. पाटील उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी बोलताना मुख्याध्यापक कोरे यांनी शालेय जीवनात वेळेला असलेले महत्व विषद करून आई वडील आपल्या शिक्षणासाठी घेत असलेल्या कष्ट व मेहनतीची विद्यार्थ्यांनी जाणीव ठेऊन त्यांच्या आशा आकांशा व स्वप्नपूर्तीसाठी प्राप्त वेळेचे योग्य नियोजन व सदुपयोग करून आपल्या ध्येय प्राप्तीसाठी सकारात्मक प्रयत्न करावेत या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. संस्थाअध्यक्ष गोविंदराव गव्हाणे यांनी सामाजिक बांधिलकीतून सुरु असलेल्या शाळेच्या वाटचालीविषयी समाधान व्यक्त करून शाळांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी दहावीच्या मुला-मुलींनी आपल्या मनोगतातून हृदयस्पर्शी भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक विश्वास मोरलवार यांनी केले. एस. के. स्वामी यांनी वर्धापन दिनानिमित्त शाळेच्या बावीस वर्षातील वाटचालीची माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर शिवाजी भोसले यांनी सूत्रसंचालन केले व व्ही. टी. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातृम गीताने झाली. यावेळी विध्यार्थीं, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
11 February 2018
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई चे कोषाध्यक्ष विनायकरावजी पोखरीकर यांनी पुस्तक भेट देऊन तर शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. शशिकांतजी टेकाळे यांनी शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन श्री. कोरे यांना सन्मानित केले. यावेळी उपस्थित विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक संतोषजी देशमुख, शिक्षक प्रतिनिधी पिंपळे सर, कोदरकरजी, अरुण पत्की सर…
कै. मिनाक्षीताई मोहरीर विभागीय वक्तृत्व स्पर्धेत रोख पाच हजार रुपये, स्मृती चिन्हं व प्रमाणपत्र प्राप्त करणारी अंबाजोगाई येथील श्री.खोलेश्वर विद्यालयाची कु. भक्ती अतुलजी देशपांडे या विद्यार्थिनीशी भा. शि. संस्था कार्यालयात संवाद साधतांना शाळा सिद्धी राज्य निर्धारक देविदास कोरे सोबत उपस्थित संस्थेचे कोषाध्यक्ष विनायकरावजी पोखरीकर, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष शशिकांत टेकाळेजी प्रशालेचे मुख्याध्यापक संतोषजी देशमुख, उपमुख्याध्यापक अनंतराम कोपले सर, श्रीकांत देशपांडे सर…
अंबाजोगाई: केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय अंतर्गत महाराष्ट्र राज्य विद्या प्राधिकरण, पुणे द्वारा शाळा सिध्दी उपक्रमाचा भाग म्हणून शाळा तपासणी तथा बाह्यमूल्यमापन सामारोप प्रसंगी विद्यालयातील सर्व विभाग प्रमुख व शिक्षकांना मार्गदर्शन करताना शाळा सिद्धी बाह्य राज्यनिर्धारक श्री. देविदास कोरे म्हणाले, की अंबाजोगाई येथील श्री. खोलेश्वर माध्यमिक विद्यालयातील विविध उपक्रम विद्यासभा अंतर्गत चालतात हि स्तुत्य बाब असून त्यामुळे विद्यार्थी विकासाला संधी मिळते व विद्यार्थ्यांची गुणवत्ता सातत्याने वृदिंगत होवून विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेख उंचावतो. याप्रसंगी मंचावर भा.शि.प्र.संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. विनायकराव पोखरीकर, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री शशिकांतराव टेकाळे, मुख्याध्यापक श्री. संतोषराव देशमुख, उपमुख्याध्यापक अनंतराम कोपले, शिक्षक प्रतिनिधी पिंपळे सर, पर्यवेक्षक अरूण पत्की उपस्थित होते.
पुढे बोलताना कोरे म्हणाले, की तपासणी करताना शिक्षकांनी आपआपल्या विभागातील अहवाल लेखी स्वरूपात अद्यावत ठेवले असून ही उल्लेखनीय बाब असल्याचे मत व्यक्त केले. विद्यालयातील मूल्यमापन, क्रीडाविभाग, विज्ञान प्रयोग शाळा, ग्रंथालय, संगीत, चित्रकला, शालेय पोषण आहार, एन एन सी , स्पर्धा परीक्षा, कार्यालयीन व प्रसिध्दी विभाग इत्यादी विभागाची तपासणी केली असता विद्यालयातील उपक्रमांची दिशा विद्यालयाचा दर्जा दर्शविते या शब्दात विद्यालयात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचा त्यांनी गौरव केला.
विजेचा स्वतःचा सौर ऊर्जा प्रकल्प राबून हि शाळा आपला एक वेगळा ठसा व आदर्श राज्यापुढे निर्माण करत आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून विवेक ग्राम दत्तक योजना अंतर्गत अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी गाव या शाळेने पंधरा वर्षासाठी दत्तक घेऊन वृक्षारोपन व पाणी बचती संदर्भात जनजागृतीचे काम असो की आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलाच्या मोफत शिक्षणाची केली जाणारी सोय हि या शाळेची सामाजिक बांधिलकी उल्लेखनीय बाब असून केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हे संस्थेचे ब्रीद आपल्या क्रातीयुक्त योगदानातून हि शाळा पूर्ण करत असल्याचे मत श्री. कोरे यांनी व्यक्त केले. व संस्थेने मुलांना शुद्ध पाणी पुरवठ्याची योजना कार्यान्वित करण्याची या प्रसंगी संस्था पदाधिकाऱ्यांना सूचना केली.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थीनी पार्श्वगायिका ऋचा कुलकर्णी, उत्तम वक्ता असलेली भक्ती देशपांडे , एन एन सी कँप मधिल गोल्ड मेडल प्राप्त करणारे रोहण सांगळे व प्रविण तिडके या विद्यार्थ्यांचे कोरे यांनी पुष्पगुछ देऊन त्यांचे अभिनंदन केले. व पुढे शाळा सिद्धी राज्य निर्धारक देविदास कोरे यांनी विद्यालय 'अ' श्रेणीत असल्याने राष्ट्रीय स्तरावरील तपासणीस विद्यालयाने अधिक सज्ज रहावे व शाळेला 'अ' श्रेणी कायम रहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोपात शशिकांतजी टेकाळे यांनी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, कर्मचा-यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वर्षात शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी अधिकाधिक परिश्रम घेतले जातील व या विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न केले येतील तसेच तात्काळ शुद्ध पाणीपुरवठ्याची व्यापक योजना शाळेत सुरू केली जाईल अशी या प्रसंगी ग्वाही दिली. या वेळी सर्व विभाग प्रमुख, शिक्षक बंधू भगिनी यांची उपस्थिती होती.
N.N.C. All India Treaking Camp Tirupati (A.P) येथील राष्ट्रीय संचलनात सुवर्ण पदक पटकावणारे अंबाजोगाई येथील श्री.खोलेश्वर विद्यालयाचे इयत्ता 9 वी तील प्रविण शंकर तिडके व रोहन भागवत सांगळे या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन शाळा सिद्धी राज्य निर्धारक देविदास कोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनंतराम कोपलेजी, प्रशिक्षक शैलेंद्र कंगळे सर, जयेंद्र कुलकर्णी सर, विलास गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख श्रीकांत देशपांडे सर इ…
N.N.C. विभागाने प्राप्त केलेले विविध मेडल्स, ट्रॉफी,व पुरस्कारांची पहाणी करताना अंबाजोगाईच्या श्री.खोलेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समवेत देविदास कोरे, प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनंतराम कोपले, जयेंद्र कुलकर्णी सर, ,प्रसिद्धी प्रमुख श्रीकांत देशपांडे, विलास गायकवाड सर इ..
मानव संसाधन व मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून राष्ट्रीय स्तरावर 'बालश्री' पुरस्कारासाठी निवड झालेली व कलर्स मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील मालिकेत ' पहाट झाली ग !' या गीताची नवोदित पार्श्व गायिका अंबाजोगाईच्या श्री. खोलेश्वर विद्यालयात इयत्ता 9 वी च्या वर्गात शिकणारी प्रतिभावान कु. ऋचा कुलकर्णी या विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र देऊन शाळा सिद्धी राज्य निर्धारक देविदास कोरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या प्रसंगी आकाशवाणीचे मान्यताप्राप्त गायक व विद्यालयातील संगीत शिक्षक जयंद्रजी कुलकर्णी सर, उप मुख्याध्यापक अनंतराम कोपले सर, शैलेंद्रजी कंगळे सर, विलास गायकवाड सर श्रीकांत देशपांडे इ..
विद्यालयातील उपक्रमांची दिशा श्री खोलेश्वर विद्यालयाचा दर्जा दर्शविते - श्री देविदास कोरे
अंबाजोगाई: केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय अंतर्गत महाराष्ट्र राज्य विद्या प्राधिकरण, पुणे द्वारा शाळा सिध्दी उपक्रमाचा भाग म्हणून शाळा तपासणी तथा बाह्यमूल्यमापन सामारोप प्रसंगी विद्यालयातील सर्व विभाग प्रमुख व शिक्षकांना मार्गदर्शन करताना शाळा सिद्धी बाह्य राज्यनिर्धारक श्री. देविदास कोरे म्हणाले, की अंबाजोगाई येथील श्री. खोलेश्वर माध्यमिक विद्यालयातील विविध उपक्रम विद्यासभा अंतर्गत चालतात हि स्तुत्य बाब असून त्यामुळे विद्यार्थी विकासाला संधी मिळते व विद्यार्थ्यांची गुणवत्ता सातत्याने वृदिंगत होवून विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेख उंचावतो. याप्रसंगी मंचावर भा.शि.प्र.संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. विनायकराव पोखरीकर, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री शशिकांतराव टेकाळे, मुख्याध्यापक श्री. संतोषराव देशमुख, उपमुख्याध्यापक अनंतराम कोपले, शिक्षक प्रतिनिधी पिंपळे सर, पर्यवेक्षक अरूण पत्की उपस्थित होते.
पुढे बोलताना कोरे म्हणाले, की तपासणी करताना शिक्षकांनी आपआपल्या विभागातील अहवाल लेखी स्वरूपात अद्यावत ठेवले असून ही उल्लेखनीय बाब असल्याचे मत व्यक्त केले. विद्यालयातील मूल्यमापन, क्रीडाविभाग, विज्ञान प्रयोग शाळा, ग्रंथालय, संगीत, चित्रकला, शालेय पोषण आहार, एन एन सी , स्पर्धा परीक्षा, कार्यालयीन व प्रसिध्दी विभाग इत्यादी विभागाची तपासणी केली असता विद्यालयातील उपक्रमांची दिशा विद्यालयाचा दर्जा दर्शविते या शब्दात विद्यालयात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचा त्यांनी गौरव केला.
विजेचा स्वतःचा सौर ऊर्जा प्रकल्प राबून हि शाळा आपला एक वेगळा ठसा व आदर्श राज्यापुढे निर्माण करत आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून विवेक ग्राम दत्तक योजना अंतर्गत अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी गाव या शाळेने पंधरा वर्षासाठी दत्तक घेऊन वृक्षारोपन व पाणी बचती संदर्भात जनजागृतीचे काम असो की आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलाच्या मोफत शिक्षणाची केली जाणारी सोय हि या शाळेची सामाजिक बांधिलकी उल्लेखनीय बाब असून केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हे संस्थेचे ब्रीद आपल्या क्रातीयुक्त योगदानातून हि शाळा पूर्ण करत असल्याचे मत श्री. कोरे यांनी व्यक्त केले. व संस्थेने मुलांना शुद्ध पाणी पुरवठ्याची योजना कार्यान्वित करण्याची या प्रसंगी संस्था पदाधिकाऱ्यांना सूचना केली.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थीनी पार्श्वगायिका ऋचा कुलकर्णी, उत्तम वक्ता असलेली भक्ती देशपांडे , एन एन सी कँप मधिल गोल्ड मेडल प्राप्त करणारे रोहण सांगळे व प्रविण तिडके या विद्यार्थ्यांचे कोरे यांनी पुष्पगुछ देऊन त्यांचे अभिनंदन केले. व पुढे शाळा सिद्धी राज्य निर्धारक देविदास कोरे यांनी विद्यालय 'अ' श्रेणीत असल्याने राष्ट्रीय स्तरावरील तपासणीस विद्यालयाने अधिक सज्ज रहावे व शाळेला 'अ' श्रेणी कायम रहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोपात शशिकांतजी टेकाळे यांनी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, कर्मचा-यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वर्षात शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी अधिकाधिक परिश्रम घेतले जातील व या विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न केले येतील तसेच तात्काळ शुद्ध पाणीपुरवठ्याची व्यापक योजना शाळेत सुरू केली जाईल अशी या प्रसंगी ग्वाही दिली. या वेळी सर्व विभाग प्रमुख, शिक्षक बंधू भगिनी यांची उपस्थिती होती.
27 December 2016
अल्प परिचय
नाव :- देविदास नामदेवराव कोरे
शैक्षणिक पात्रता:- [एम. ए. बी. एड.]
पद:- मुख्याध्यापक
अनुभव:- १६ वर्ष
कार्यरत शाळा:- जयहिंद विद्यालय सिंदीजवळगा तालुका निलंगा जिल्हा लातूर
लेखन:- राज्यातील विविध वर्तमान पत्र व मासिकातून राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयावरील अनेक लेख व कविता प्रकाशित. अंकुर सुविचार संग्रह, यशोदीप मराठी निबंध लेखन व व्याकरण इयत्ता १० वी सराव पुस्तिका इत्यादी पुस्तके प्रकाशित.
सन्मान:- सामाजिक संस्थांचे जिल्हा व राज्यस्तरावरील कांही पुरस्कार प्राप्त.
छंद :- वाचन, मनन, चिंतन तथा लेखन. सामाजिक बांधिलकीतून समाज कार्यात सहभाग.
ब्लॉग:- devidaskore.blogspot.in या ब्लॉग वर विविध विषयावरील लेख प्रकाशित.
संपर्क नंबर:- 9730325000/9420869000
20 November 2016
मूल्यशिक्षण : दशा व दिशा
मूल्यशिक्षण हा शिक्षणाचा मूलाधार आहे. शिक्षणातून सुसंस्कृत मानव घडावा. समाजाचा नेतिक स्तर उंचावा म्हणून प्राचीन गुरुकुल पद्धतीपासून ते १९८६ च्या राष्ट्रीय शेक्षणिक धोरणापर्यंत चारित्र्य संवर्धनावर विशेष भर देण्यात आला. १९६४ मध्ये शिक्षण आणि राष्ट्रीय विकास या शिक्षण आयोगात डॉ. कोठारी यांनी नेतिक मुल्यांची जोपासना हे शिक्षणाचे प्रमुख उदिष्ट मानले.
माणसाला स्वताचे माणूसपण शिक्षणातून गवसले पाहिजे. विद्यार्थ्याचे मन, शरीर व आत्मा या त्रीयी मध्ये जे सुप्त उतमत्व आहे. त्याचा सर्वांगीण विकास घडवणं, शिलवान, चारित्र्य संपन्न,संस्कारक्षम पिढी निर्माण कारण या दृष्टीकोनातून उद्याचा आदर्श भारत आजच्या शालेय वर्गातून घडला पाहिजे. ही महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची सर्वकष अपेक्षा होती. पण ती आजच्या शिक्षणातून सध्या होत आहे का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
व्यक्तीचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचं ध्येय आहे. मानवी जीवनाच्या बॊद्धिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक, भोतिक, सोदर्यविषयक व सांकृतिक अंगाबाबत जे उत्कृष्ट नेतिक व समाजमान्य आहेत. ती मुल्य विद्यार्थ्यात संक्रमित झाली पाहिजेत. व्यक्तीचं अंतर्बाह्य जीवन सुखी, शांत, समाधानी, विकसित व उन्नत व्हावं, सत्य, सुंदर, हि मुल्य मनात रुजावीत हे मुल्य शिक्षणाचं व्यापक उद्धिष्ट आहे. व्यक्तिगत, सामाजिक, व राष्ट्रीय मुल्य विद्यार्थ्यात अनओपचारिक शिक्षणातून संस्करीत होणे आपेक्षित आहे.मूल्य ही अमूर्त संकल्पना आहे. सुसंस्कारित व्यक्तीच्या आचार विचारातून मूल्य व्यक्त होतात. प्रत्यक्ष आचरणातून मूल्यांचे संरक्षण, जतन संवर्धन व संक्रमण होत असते. सुसंस्कासंपन्न व्यक्तिमत्व हा मूल्यशिक्षणाचा उद्देश आहे. या दृष्टीने मूल्यशिक्षण व्यक्तित्व विकासाचे साधन आहे.
माणूस किती वर्ष जगला यापेक्षा तो कसा जगावा हे महत्वाचे आहे. म्हणून मूल्याशिक्षणाचा हेतू व्यापक आहे.पण आज शाळांत दिल्या जाणाऱ्या मूल्यशिक्षणातून तो सफल होत आहे का ? स्वावलंबन, श्रमप्रतिष्ठा, राष्ट्रभक्ती, वेज्ञानिक दृष्टीकोन, समता, बंधुभाव, अहींसा, मानवता, शिस्त, संवेदनशीलता, न्यायप्रियता, सोजन्य, सहिष्णूता, खिलाडूवृत्ती, सर्वसमभाव, परस्पर सहकार्य, आदरभाव, राष्ट्रीय एकात्मता, आदी मूल्यापेकी किती मूल्य सध्या दिल्या जाणाऱ्या मूल्याशिक्षणातून विद्यार्थ्यात संस्कारीत संक्रमित होत आहेत ? शांतता, सामंजश्य, सहानभूती, सरह्दयता, या प्रवृत्ती विद्यार्थ्यात जोपासल्या जात आहेत का ? वर्तन, शील, चारित्र्य, त्याग, सारासार विवेक, समतोल दृष्टी, निरपेक्ष वृत्ती, हे व्यक्तिमत्वाचे पेलू विकसित होत आहेत का ? मूल्यशिक्षणातून किती विद्यार्थ्यात आत्मभानाची जाणीव विकसित होत आहे.
गुरुजन वाडीलधारी माणसं याना आजच्या विद्यार्थ्याकडून मान आदर मिळतो का ? नसेल तर आशी परिस्थिती का निर्माण व्हावी याला जबाबदार असलेल्या घटकांनी आत्मशोध घेणे आवश्यक नाही का ? सध्या मूल्यशिक्षण शाळांमधून कर्तव्यनिष्ठेने, व प्रभावीपणे दिले जाते का ? या प्रश्नांची उत्तरे फारशी समाधानकारक नाहीत हि वस्तविकता प्रांजळपणे मान्य करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीत आपण आत्तापर्यंत सर्वसाधारण मूल्यही का संस्कारित करू शकलो नाही. याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज निर्माण होत आहे.
समाजात अस्थिरता, अशांतता, अविश्वास, स्वार्थ, लाचारी, धर्मांधता, कटुता द्वेश, भ्रष्टाचार, तिरस्कार, अनाचार, या दुष्प्रवृत्ती फोफावत आहेत. माया स्नेह, आपुलकी, जिव्हाळा, दया, क्षमा, शांती, सरह्द्यता,सहानभूती, व मानवता संपत आहे. शिस्त, ज्ञान, शील, प्रामाणीकपणा चारित्र्य याला गोणत्त्व येत आहे.
झटपट श्रीमंत कसे होता येईल ? याकडेच अनेकांचे लक्ष लागले आहे. यातूनच समाजविघातक हिंसक प्रवृत्ती बळावत आहेत. समाजाचा नेतिक स्तर खालावत आहे. त्याग, तत्त्वनिष्ठा, सहिष्णूता,सत्य, सदाचरण, इत्यादी मूल्य पायदळी तुडवली जात आहेत. बेईमानी, फुटीरता, कट्टर धार्मिकता, संकुचित प्रादेशिकता जातीयता, भ्रष्टाचार, चंगळवाद बोकाळला आहे. उबग आणणारं सत्तापिपासू राजकारण ,केबल, दूरदर्शन मालिका, चित्रपट यातून होत असलेले मूल्यहीन संस्कार या अनेकविध समाजविघातक अनिष्ट प्रवृत्तींचा कळत नकळत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम बालवयातील संस्कारक्षम मुलांवर होणे अपरिहार्य आहे. समाजव्यवस्थाच आशा अपप्रवृत्तीत रुतत चालली असल्याने प्राचीन भारतीय संस्कृतीतील आदर्श मूल्यांना तडे जात आहेत.
समाज परिवर्तनाची दिशा ठरवण्याचं सामर्थ्य मूल्यशिक्षणात असलं तरी सध्या शिक्षण हा व्यवसाय झाला आहे. त्याला पुरती बाजारू अवकळा आली आहे. शिक्षणा विषयी काडीचीही आस्था नसणाऱ्या राज्यकर्त्यांनी शिक्षणक्षेत्रात धुमाकुळ घातला आहे. शेक्षणिक दुरदृष्ठीचा आभाव, ध्येयवादाचा दुष्काळ, प्रवेशातील भ्रष्टाचार बिनबोभाट सुरु आहे. निकाल वृद्धीसाठी आनिष्ट् मार्ग आवलबण्याची प्रवृत्ती वाढत आहे. शिक्षण क्षेत्राचं हे चित्र निराशाजनक आहे.
शाळांतून जे मूल्यशिक्षण विद्यार्थ्यांना देणं, रुजवणं, संक्रमित तथा संस्कारित होणं अभिप्रेत आहे. त्यालाच भ्रष्ट शिक्षण प्रक्रियेत तिलांजली मिळत आहे. परिणामत: मूल्यशिक्षणाची दिशा व दशा खालावत आहे. ही चिंताजनक बाब आहे. मूल्यशिक्षणाची आशी स्थिती व्हावी ही एक प्रकारची शोकांतिकाच नव्हे का ? आजच्या शिक्षणातून माणूस घडत आहे कि बिघडत आहे.? आस प्रश्न निर्माण होत आहे. शिकलेली मुलं बंद, मोर्चे, लुटालूट, जाळपोळ,, मोडतोड आशी हिंसक कृत्य करतात. समाजविघातक प्रवृत्ती, लाचलुचपत, व्यासनांधता, बेजबाबदारी, झुंडशाही, अविवेक, विध्वंसक प्रवृत्ती इत्यादी आजच्या शिक्षण व्यवस्थेची कटू अपत्यच नव्हेत का ? या बाबीचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.
मुळात शिक्षणाचा संबंध आचार विचार व वर्तनाशी आहे. म्हणून विद्यार्थ्यांच्या मनावर मूल्य सुसंस्कारित व्हावीत या दृष्ठीने विचार व आचारात साम्य पाहिजे. खरं म्हणजे घर हीच पहिली संस्कार शाळा आहे. म्हणून घराघरातून सोख्य, प्रेम,दया, त्याग, सत्य, नम्रता, सदभाव, राष्ट्रभक्ती इत्यादी सद्गुणांची जपणूक वडिलधाऱ्या व्यक्तींच्या विचार आचारातून होणे आवश्यक आहे.
बालवयात झालेले संस्कारमूल्य चिरकाल टिकून राहतात. म्हणून कुटूंब व शाळांतून सुसंस्कारासाठी अनुकूल वातावरण निर्माण केले पाहिजे. जीवनातील संकटं आवाहनं पेलण्याचं सामर्थ्य व बळ मुलांना सुसंस्कारातून लाभत लाभत असते. त्यामुळे मुलांच्या निकोप शारीरिक व मानसिक वाढीकडे माता,पिता,कुटूंब, समाज, शाळा व गुरुजनांकडून जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. तरच योग्य वयात विध्यार्थ्यात अक्षर जीवन मूल्यांचे बीजारोपण होऊन मूल्यशिक्षणाचा हेतू साध्य होईल असा विश्वास वाटतो.
- देविदास कोरे
मुख्याध्यापक
जयहिंद विद्यालय सिंदीजवळगा
ता. निलंगा जि. लातूर
मो. नं -97 30 32 5000
Email ID: devidaskore21@gmail.com
Email ID: devidaskore21@gmail.com
18 November 2016
शिक्षकांच्या मानगुटीवर सेल्फीचा खुळ खुळा
अलीकडे शिक्षण क्षेत्रात दिवसागणिक नव नवीन प्रयोग सुरू आहेत. ते आता शिक्षकांच्याही अंगवळणी पडत आहेत. एखाद्या दिवशी शिक्षण खात्याचा नवीन नियम वाचण्यात आला नाही अथवा कानावर पडला नाही तर शिक्षकांना ओशाळल्यासारखे होऊन आज कालचा जुनाच दिवस आहे की काय ? असा भाबडा भ्रम होतो ! ही सध्याच्या शिक्षणक्षेत्रातील वास्तविकता आहे. ती कशी नाकारता येईल ?
शिक्षणाच्या आयचा घो होय ! आता असे म्हणायचीच स्थिती सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत निर्माण झाली आहे. तीन नोव्हेंबर २०१६
रोजी स्थलांतरित होणाऱ्या व शाळेत अनियमित राहणाऱ्या मुलांना शाळेत नियमित करण्याबाबत शासन निर्णय घेण्यात आला असून त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकाच खळबळ उडाली आहे. जानेवारी २०१७ पासून महिन्याच्या दर सोमवारी शाळेच्या पटावर असलेल्या वर्गातील मुलांची उपस्थिती पडताळण्यासाठी वर्ग शिक्षकांनी मुलांचे दहा दहा चे गट करून त्यांची सेल्फी काढावी. या सेल्फी मध्ये असलेल्या मुलांची नावे आणि आधार क्रमांकासह हे सेल्फी फोटो शिक्षण खात्याच्या सरल वेबसाईटवर ऑनलाईन अपलोड करायवे. असे निर्देश या शासनादेशात देण्यात आले आहेत.
राज्यातील कांही शाळांमध्ये दोन हजारांपेक्क्षाही अधिक विध्यार्थी संख्या आहे. दहा दहा च्या गटात वर्ग शिक्षकांने मुलांसोबत सेल्फी काढायची म्हंटले तर दिवस तरी पुरेल का ? हे काढलेले सेल्फीचे फोटो ऑनलाईन अपलोड कराचे ! खेड्यापाड्यातील किती शाळांमध्ये संगणक चालू स्थितीत आहेत? जलदगती इंटरनेट ची सुविधा वस्ती, पाडे, तांडे व खेड्यातील शाळांमध्ये आहे का ? कांही शाळांमध्ये मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत तर बहुतांश शाळांत पुरेशा संख्येत शिक्षक नाहीत. या वस्तुस्थितीचा कसलाही विचार न करता शिक्षण खात्याने अफलातून निर्णय घेवून शिक्षकांच्या हाती मात्र सेल्फीचा खुळ खुळा दिला आहे. आता दीपावली सुट्ट्या संपून जिल्याहातील शाळा २१ नोव्हेंबर पासून सुरु होत आहेत. खेड्यातील शाळांमध्ये सुरवातीचे तीन चार दिवस मुलांची उपस्थिती नगण्य असते. सुरवातीच्या आठवड्यात शाळेचे तोंड न पाहणाऱ्या मुलांना शाळेत आणून सेल्फी काढण्यासाठी शिक्षकांना कमालीची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून शिक्षण क्षेत्रात एकाच खळबळ निर्माण झाली आहे.
शिक्षकांची नेमणूक नेमकी कशासाठी आहे ? असा प्रश्न आता प्रामुख्याने निर्माण झाला आहे ? शिक्षकांनी मुलांना शिकवायचे सोडून ही व अशीच अन्य कामे करायची का ? वर्गात मुलांना शिकवण्यासाठी शिक्षकांना पुरेसा वेळ मिळाला नाही तर मुले कशी शिकतील ? ती प्रगत होतील का ? शिक्षकांना आशा कामात जर गुंतवून ठेवले तर शाळा कशा प्रगत होतील ? असे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होत असून हा निर्णय अव्यवहार्य असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांमध्ये उमटत आहेत. शिक्षणाचा मूळ हेतू गुंडाळून ठेवून वस्तुस्थितीचा कसलाही विचार न करता सेल्फी सारखे निर्णय होत असतील तर ही खेदाची बाब आहे.
देविदास कोरे
(लेखक, जयहिंद विद्यालय सिंदीजवळगा ता. निलंगा जि. लातूर येथे मुख्याध्यापक आहेत.)
पूर्व प्रसिद्धी - दै. ‘पुण्यनगरी’ दि. १७ नोव्हें २०१६
10 November 2016
माती…… ( Kavita )
मी
हातातले
मोती
फेकून दिले.
अन ….
हातात
माती घेतली
मोत्या पेक्षा
मातीच
मला
मोलाची वाटली.
ती
मुठभर माती
मला
जगण्याचं बळ
वाटली.
त्या
मातीचा
वास
मला
परिचित होता.
बापाने
आयुष्यभर
गाळलेल्या
घामाचाच
तिला
गंध होता.
ती माती
मीतसाच
न्याहाळीत होतो
आयुष्य माझं
तिच्या
स्रजनक्षमतेत
उलगडत….
शोधत….
होतो.
- देविदास कोरे ( लातूर )
MO - 97 30 32 5000
Email: devidaskore21@gmail.com.
हातातले
मोती
फेकून दिले.
अन ….
हातात
माती घेतली
मोत्या पेक्षा
मातीच
मला
मोलाची वाटली.
ती
मुठभर माती
मला
जगण्याचं बळ
वाटली.
त्या
मातीचा
वास
मला
परिचित होता.
बापाने
आयुष्यभर
गाळलेल्या
घामाचाच
तिला
गंध होता.
ती माती
मीतसाच
न्याहाळीत होतो
आयुष्य माझं
तिच्या
स्रजनक्षमतेत
उलगडत….
शोधत….
होतो.
- देविदास कोरे ( लातूर )
MO - 97 30 32 5000
Email: devidaskore21@gmail.com.
22 October 2016
आधार .....
जखमी मनाला
खळखळून वाहयचं असतं
कुठं तरी मोकळी वाट
शोधायचं असतं.
ओघळणारे अश्रू
थांबणार नसले…
तरी...
जगायचा आधार
पेलायचं असतं.
ऊन सावलीच्या खेळात
उभारायचं असतं
आशा निराशेच्या छायेत
वावरायचं असतं.
आदर्शाच्या आधारानं
वाढायचं असतं
वर वर आकाशाला
भिडायचं असतं.
- देविदास कोरे (लातूर )
मो. नं - 97 30 32 5000
Email: devidaskore21@gmail.com.
27 June 2016
देविदास कोरे यांची मराठी विषय विभागीय कार्यशाळेसाठी निवड
निलंगा:-
शासनाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत दिनांक २९ व ३० जून २०१६ या कालावधीत औरंगाबाद येथे होण्याऱ्या दोन दिवसीय विभागीय मराठी विषयाच्या कार्यशाळेसाठी लातूर जिल्ह्यातून सिंदीजवळगा ता. निलंगा येथील जयहिंद विद्यालयाचे मुख्याध्यापक देविदास कोरे यांची निवड झाली आहे.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वैजापूर जि. औरंगाबाद या संस्थेमार्फत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विभागीय स्तरावर मराठी विषयाची ही दोन दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्यात लातूर जिल्ह्यातून देविदास कोरे यांची निवड झाल्याबद्दल श्री. शामागीर शिक्षण संस्थेचे सचिव ए. आर. लांडगे गुरुजी, कार्याध्यक्ष वसंतराव पाटील, मराठवाडा मुख्याध्यापक संघाचे सचिव दिलीपराव धुमाळ, लातूर विभागीय मंडळाचे माजी सदस्य तानाजी पाटील, निलंगा तालूका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ज्ञानदेव बरमदे, सचिव अजय मोरे, डॉ. राजेश्वर पाटील, मुख्याध्यापक एस. एन. शिरमाळे, संजय कदम, पी. आर. रेड्डी, एच. बी. दिवे, एस. बी. परिहार यांनी या निवडीबद्दल अभिनंदन करून कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
23 June 2016
बहूजन उद्धारक : राजर्षी शाहू महाराज
इतिहासात अनेक राजे झाले पण जनतेच्या ह्दयावर अधिराज्य करणारे राजे बोटावर मोजण्याइतकेच झाले. त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज अग्रस्थानी आहेत. ' बहूजन हित व बहूजन सुख' या करीता आपली राजसत्ता राबवणारा लोककल्याणकारी राजा म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो.
छञपती शाहू महाराज जनतेचे राजे होते. ते जसे मानवतेचे उपासक होते तसे गरीबांचे उद्धारकही होते. राजर्षी शाहू समंजस व दृष्टे युगपुरुष होते. म्हणून राजा कसा असावा ? तर तो शाहू महाराजांसारखा असावा असे म्हंटले जाते. लोकांच्या कल्याणासाठी जीवनभर झिजणारया राजर्षी शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला. 17 मार्च 1884 ला त्यांचे राज्यारोहण झाले. व दोन एप्रिल 1894 रोजी त्यांनी राज्यसुञे स्वीकारली. कोल्हापूर संस्थानाचा राज्यकारभार केवळ वीसाव्या वर्षीच छञपती राजर्षी शाहू महाराजांच्या हाती आला. पुढील अठ्ठावीस वर्ष त्यांनी राजसत्तेचा वापर तळागाळातील लोकांच्या कल्याणासाठी केला. ते आयुष्यभर दीनदुबळ्या, गोरगरीबांच्या हितासाठी झटत राहीले.
राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाशिवाय बहूजनांचा विकास शक्य नाही म्हणून त्यावेळी त्यांच्या संस्थानात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. समाजातील अगदी शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाचा प्रचार व प्रसार केला. सर्व जाती धर्मातील मुलांना शिक्षणाच्या सोयी उपल्ब्ध केल्या. खेड्यापाड्यातील गोरगरीब मुलांच्या शिक्षणा करीता शाळा व वस्तिगृहांची स्थापना केली. मुले - मुली, स्पृश्य व अस्पृश्य यांच्यासाठी त्यांनी त्या काळात एकञीत शाळा सुरू केल्या. आपली विधवा सून इंदूमती यांना शिक्षण देऊन तत्कालीन समाजाला स्ञी शिक्षणाचा मार्ग दाखवला. दीनदुबळ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवले. काळाची पावले ओळखून व्यवसाय शिक्षण, तंञशिक्षणाला प्रोत्साहन दिले. प्रशिक्षण केंद्रे सुरू केली. शेतीविषयक शिक्षणाला ही त्यांनी प्राधान्य दिले. व्यायाम शाळा सुरू केल्या. राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाला बहूजन समाज उद्धारा चे साधन मानले.
समाजातील जातीयता मुळासकट उखडून टाकणे व एकजीनसी समाज निर्माण करणे त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. म्हणूनच छञपती शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहांना चालना दिली. त्यावेळी त्यांनी असे अनेक विवाह घडवून आणले. व जातीयतेच्या समूळ उच्चाटनाचे प्रयत्न केले. विधवा विवाहलाही त्यांनी प्रोत्साहन दिले. अंध रूढी , वाईट प्रथा कायद्याने बंद केल्या. म्हणूनच राजर्षी शाहू महाराजांना वास्तवादी व दृष्टे युग पुरूष म्हंटले जाते.
शेतीला पाणी मिळावे. शेतकऱ्यांचे जीवन सुधारावे यासाठी त्यांनी राधानगरी बंधारे बांधले. गोरगरीबांच्या हाताला काम मिळावे याकरीता शाहू मिलची स्थापना केली. भूमीहीन लोकांना रोजगार मिळावा म्हणून त्यांनी रोजगार हमी योजना सुरू केली. संस्थानात उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन दिले.
राजर्षी शाहू महाराजांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता, मानवता व सामाजिक न्यायची गुढी उभारली. बहूजन समाजाला विकासाची दिशा दिली. सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. शिक्षणाच्या सोयी उपल्ब्ध केल्या. उद्योग व्यवसाय उभारले. राजसत्ता लोककल्याणासाठी राबवली. म्हणून त्यांना कर्ते समाज सुधारक, दृष्टे युग पुरूष व आदर्श लोकराजा म्हणून गौरवले जाते.
- देविदास कोरे (लातूर)मुख्याध्यापक
जयहिंद विद्यालय सिंदीजवळगा
ता. निलंगा जि. लातूर
मो. - 97 30 32 5000
Email: devidaskore21@gmail.com22 June 2016
जयहिंद विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
निलंगा :-
सिंदीजवळगा (ता. निलंगा) येथील जयहिंद विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्सहात साजरा करण्यात आला. सकाळी ७ ते ८ या वेळात सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी योगाचे सर्व प्रकार केले. प्रशालेतील सहशिक्षक एच. जी. दिवे यांनी विद्यार्थ्यांना योग प्रकारा संदर्भात सविस्तर माहिती सांगून मार्गदर्शन केले. या प्रसंगी मुख्याध्यापक देविदास कोरे यांनीही विद्यार्थ्यांना उत्तम मानवी आरोग्यासाठी योगा किती महत्वाचा आहे. हे समजावून सांगितले. या वेळी सर्व शिक्षक वविद्यार्थी उपस्थित होते.
20 June 2016
जयहिंद विद्यालयाचा १०० टक्के निकाल
निलंगा:-
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा सिंदीजवळगा ता. निलंगा येथील जयहिंद विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. विद्यालयातील भाग्यश्री अनिल शेळके हिने ८४.०० टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच दिव्या रंगराव धुमाळ हि ८३.२० टक्के गुण घेवून शाळेतून द्वितीय व प्रदीप अशोक फावडे याने ७९.६० टक्के गुण घेवून तृतीय येण्याचा मान मिळवला. याबरोबरच दत्ता भिकाजी हराळे याला ८९ टक्के तर गीता बालाजी धुमाळ हिला ७८.८० टक्के गुण मिळाले. विद्यालयातून विशेष प्राविण्यासह सात , प्रथम श्रेणीत बावीस व द्वितीय श्रेणीत सात तर तृतीय श्रेणीत दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली असून यशस्वी विद्यार्थ्यांचे आभिनंदन संस्थेचे संस्थापक सचिव लांडगे गुरुजी, कार्याध्यक्ष वसंतराव पाटील, मुख्याध्यापक देविदास कोरे, पालक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.
12 May 2016
समाजातील सर्वच घटकांना समान शिक्षणाची संधी मिळावी
देशाच्या विकासात आणि पायाभरणीत शिक्षणाला अनन्य साधारण महत्व आहे. समाजाच्या सर्वांगीण विकास व प्रगतीसाठी शिक्षण प्रभावी साधन आहे. म्हणून समाजातील सर्वच घटकांना समान शिक्षणाची संधी उपलब्ध असणे आवश्यक आहे. पण सध्याचे वास्तव यापेक्षा वेगळे असून हे चित्र दुर्देवी आहे. शिक्षणामुळे या देशातील गरिबी ,दारिद्रय कमी होईल , विषमता नाहीशी होईल असे म्हंटले जाते. पण स्वातंत्र्यानंतरच्या साठ वर्षानंतरही हे सध्या झाले आहे का ? उलट गरिबी व दारिद्रयात भर पडत नाही का ? ही विषमता कमी होण्याऐवजी का वाढत आहे ? हे आज पर्यंतच्या शिक्षणाचे यश आहे की अपयश ? सर्वच क्षेत्राच्या मुळाशी शिक्षण असल्याने याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे.
- शिक्षणातील विषमता चिंताजनक:
सहा ते चौदा वर्ष वयोगटातील सर्व मुलामुलींना सक्तीचे व मोफत शिक्षण देण्याची व्यवस्था शासनाने करणे बंधनकारक आहे. त्या नुसार शासनाने धोरणात्मक निर्णय घेऊन तशी सोय व कायदाही केला आहे. वरील वयोगटातील मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यावर सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून विशेष भर देण्यात येत आहे. या दृष्टीने शासनाचे व्यापक प्रयत्न सुरु आहेत. पण तरीही सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत कमालीची विषम स्थिती दिसून येते. ही बाब चिंताजनक आहे.समाजातील सर्वच घटकांचा समान विकास घडून येण्यासाठी समान व सारख्या शाळातून दर्जेदार शिक्षणाची संधी मिळणे आवश्यक आहे. पण सध्याच्या शिक्षणात यापेक्षा वेगळे चित्र आढळते. सर्वसाधारण पणे शहरातील नगरपरिषदा , महनगरपालिकांच्या शाळांत दीनदलित , मजूर ,कामगार व गरिबांची मुले शिकताना आढळतात. तर ग्रामीण भागात शेतकरी , शेतमजुरांची मुले जिल्हापरीषदांच्या शाळांत बहुसखेने शिकताना दिसून येतात.शैक्षणिक वातावरणा आभावी दारिद्रय व गरिबीमुळे त्यांच्या शिक्षणाची हेळसांड होते. बिकट परिस्थितीमुळे ते महागड्या खाजगी शाळात , शहरात जाऊन शिकू शकत नाहीत. त्यांना शिकवणी वर्ग लावणे ही शक्य होत नाही. याउलट धनिकांची मुल सर्व प्रकारच्या सुविधा असणाऱ्या शाळांत देणग्या देवून शिकताना आढळतात .त्यांना शिकवणी वर्ग , शैक्षणिक साधने व सुख सुविधा आसतात. म्हणून त्यांना दर्जेदार शिक्षण मिळू शकते. डॉक्टर , इंजिनियर , वकील , प्राध्यापक व अन्य क्षेत्रात ते पुढे असतात. या स्पर्धेत काही अपवाद वगळता सर्वसामान्य गोरगरिबांची मुले तग धरू शकत नाहीत. त्यांच्या समोर अनेक प्रश्न असतात. त्यामुळे ते मागे पडतात. त्यामुळे गरीब अधिक गरीब तर धनिक अधिक धनिक बनतो. आणि विषमता कमी होण्या ऐवजी वाढते. म्हणून शिक्षणातील विषमता थांबवून समाजातील सर्व घटकांना समान व एकसारखे शिक्षण मिळणे आवश्यक आहे.
- शहरी व ग्रामीण भागातील दरी कमी व्हावी:
शहरी व ग्रामीण भागातील शिक्षणात काही प्रमाणात फरक दिसून येतो. शहरी भागात दर्जेदार शिक्षण मिळते. शैक्षणिक सुविधाही असतात. शिकवणीवर्गाची ही सोय असते. म्हणून ग्रामीण भागातील लोकांचा कल शहरी भागाकडे वाढताना दिसून येतो. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. काही शाळा पुढे प्रवेशासाठी रांगा लागत आहेत , तर काही शाळा मुला अभावी ओस पडत आहेत. खेड्यातील शाळांना मुलांचा शोध घ्यावा लागत आहे. पालकांची मनधरणी करून शिक्षकांना मुलांची जमवा जमवी करावी लागत आहे. आशी स्थिती का ? निर्माण होत आहे. याचे आत्मपरीक्षण शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांनी करणे आवशक आहे.शहरातील पालक आपल्या पाल्यांच्या शिक्षणाविषयी अधिक जागरूक पणे लक्ष देताना दिसून येतात. त्यांना शैक्षणिक सुविधा व साधणे ही पुरविली जतात. मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष्य दिले जाते. पण खेड्यात मात्र या पेक्षा वेगळी स्थिती आढळते. खेड्यातील पालक मुलांच्या शिक्षणाविषयी फारसे जागरूक दिसत नाहीत.मुलांत ही शिक्षणाविषयी गांभीर्य आढळत नाही. शहरांच्या तुलनेत शैक्षणिक सुविधांचा ही आभाव जाणवतो. खाजगी शिकवणीवर्ग ही नसतात. बरयाचदा पालक मुलामुलींना घरगुती व मजूराअभावी शेतातील कामे लावताना दिसून येतात. त्यामुळे शाळेतील उपस्थितीचे प्रमाण कमी होते. त्यांचा प्राथमिक शिक्षणाचा पायाही कच्चा असतो. त्यामुळे ग्रामीण भागातील शैक्षणिक दर्जा व निकाल खालावताना आढळतो.पालकांची मुलांच्या शिक्षणाविषयी असणारी उदासिनता. व शिक्षणाकडे पहाण्याची मानसिकता तसेच बहुसंख्य पालकांचा आडणीपणा यामुळे ग्रामीण भागात शिक्षणासंबंधी अनेक प्रश्न व समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागात शिक्षणात तफावत व फरक दिसून येतो. तो कमी करण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देऊन दर्जेदार शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. तरच पालकांचा शहराकडे शिक्षणासाठी वाढणारा कल कांही अंशी कमी होईल. देशातील वाढती गरिबी व विषमता कमी करण्यासाठी समाजातील सर्व घटकांना , तळागाळातील दीनदलित कामगार व गोरगरीबांच्या मुलामुलींना सारख्या व समान शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली तरच समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सारख्या प्रमाणात विकास होऊ शकेल व शैक्षणिक विषमता कमी होण्यास मदत होईल.
- देविदास कोरे (लातूर)
मो. न - 97 30 32 5000
Email: devidaskore21@gamil.com.
Subscribe to:
Comments (Atom)





















