पहा नवीन अपडेट

शैक्षणिक लेख व अन्य माहिती पूर्ण आशा शैक्षणिक ब्लॉगवर आपले मन:पूर्वक स्वागत.

07 March 2018

यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम आवश्यक  

                        -  मुख्याध्यापक देविदास कोरे      
निलंगा:-  
कोणत्याही क्षेत्रात आपले ध्येय गाठून यश मिळवायचे असेल तर त्यासाठी अभ्यासातील सातत्य चिकाटी, वेळेचा सदुपयोग, सकारात्मक वृत्ती व कठोर परिश्रमाची आवश्यकता असते. असे मत मुख्याध्यापक देविदास कोरे यांनी सोनखेड ता. निलंगा येथील चन्नबसवेश्वर विद्यालयाच्या तेवीसावा वर्धापन दिन व  दहावी विद्यार्थी निरोपसमारंभा निमित्त सहवीस फेब्रुवारी सोमवार रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष गोविंदराव गव्हाणे, शाळेचे मुख्याध्यापक विश्वास मोरलवार  जिल्हा परिषद प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक बी. एम. पाटील, एस. के. स्वामी, शिवाजी भोसले, व्ही. टी. पाटील, एस. एन. सूर्यवंशी, एस. सी. पाटील उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी बोलताना मुख्याध्यापक कोरे यांनी शालेय जीवनात वेळेला असलेले  महत्व विषद करून आई वडील आपल्या शिक्षणासाठी घेत असलेल्या कष्ट व मेहनतीची विद्यार्थ्यांनी जाणीव ठेऊन त्यांच्या आशा आकांशा व स्वप्नपूर्तीसाठी प्राप्त वेळेचे योग्य नियोजन व सदुपयोग करून आपल्या ध्येय प्राप्तीसाठी सकारात्मक प्रयत्न करावेत या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. संस्थाअध्यक्ष गोविंदराव गव्हाणे यांनी सामाजिक बांधिलकीतून सुरु असलेल्या शाळेच्या वाटचालीविषयी समाधान व्यक्त करून शाळांत प्रमाणपत्र परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी दहावीच्या मुला-मुलींनी आपल्या मनोगतातून हृदयस्पर्शी भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक विश्वास मोरलवार यांनी केले. एस. के. स्वामी यांनी वर्धापन दिनानिमित्त शाळेच्या बावीस वर्षातील वाटचालीची माहिती देऊन विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन केले. तर शिवाजी भोसले यांनी सूत्रसंचालन केले व व्ही. टी. पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातृम गीताने झाली. यावेळी विध्यार्थीं, कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

11 February 2018

भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई चे कोषाध्यक्ष विनायकरावजी पोखरीकर यांनी पुस्तक भेट देऊन तर शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. शशिकांतजी टेकाळे यांनी शाल श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन श्री. कोरे यांना सन्मानित केले. यावेळी उपस्थित विद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक संतोषजी देशमुख, शिक्षक प्रतिनिधी पिंपळे सर, कोदरकरजी, अरुण पत्की सर…

N.N.C. All India Treaking Camp Tirupati (A.P) येथील राष्ट्रीय संचलनात सुवर्ण पदक पटकावणारे अंबाजोगाई येथील श्री.खोलेश्वर विद्यालयाचे इयत्ता 9 वी तील प्रविण शंकर तिडके  व रोहन भागवत सांगळे या विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन शाळा सिद्धी राज्य निर्धारक देविदास कोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनंतराम कोपलेजी, प्रशिक्षक शैलेंद्र कंगळे सर, जयेंद्र कुलकर्णी सर, विलास गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख श्रीकांत देशपांडे सर इ…

N.N.C. विभागाने प्राप्त केलेले विविध मेडल्स, ट्रॉफी,व पुरस्कारांची पहाणी करताना अंबाजोगाईच्या श्री.खोलेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समवेत देविदास कोरे, प्रशालेचे उपमुख्याध्यापक अनंतराम कोपले, जयेंद्र कुलकर्णी सर, ,प्रसिद्धी प्रमुख श्रीकांत देशपांडे, विलास गायकवाड सर इ..
मानव संसाधन व मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून राष्ट्रीय स्तरावर 'बालश्री' पुरस्कारासाठी निवड झालेली व कलर्स मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावरील मालिकेत ' पहाट झाली ग !' या गीताची नवोदित पार्श्व गायिका अंबाजोगाईच्या श्री. खोलेश्वर विद्यालयात इयत्ता 9 वी च्या वर्गात शिकणारी प्रतिभावान कु. ऋचा कुलकर्णी या विद्यार्थिनींचा प्रमाणपत्र देऊन शाळा सिद्धी राज्य निर्धारक देविदास कोरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या प्रसंगी आकाशवाणीचे मान्यताप्राप्त गायक व विद्यालयातील संगीत शिक्षक जयंद्रजी कुलकर्णी सर, उप मुख्याध्यापक अनंतराम कोपले सर, शैलेंद्रजी कंगळे सर, विलास गायकवाड सर श्रीकांत देशपांडे इ..
कै. मिनाक्षीताई मोहरीर विभागीय वक्तृत्व स्पर्धेत रोख पाच हजार रुपये, स्मृती चिन्हं व प्रमाणपत्र प्राप्त करणारी अंबाजोगाई येथील श्री.खोलेश्वर विद्यालयाची कु. भक्ती अतुलजी देशपांडे या विद्यार्थिनीशी भा. शि. संस्था कार्यालयात संवाद साधतांना शाळा सिद्धी राज्य निर्धारक देविदास कोरे सोबत उपस्थित संस्थेचे कोषाध्यक्ष विनायकरावजी पोखरीकर, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष शशिकांत टेकाळेजी प्रशालेचे मुख्याध्यापक संतोषजी देशमुख, उपमुख्याध्यापक अनंतराम कोपले सर, श्रीकांत देशपांडे सर…


विद्यालयातील उपक्रमांची दिशा श्री खोलेश्वर विद्यालयाचा दर्जा दर्शविते - श्री देविदास कोरे


अंबाजोगाई: केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय अंतर्गत महाराष्ट्र राज्य विद्या प्राधिकरण, पुणे द्वारा शाळा सिध्दी उपक्रमाचा भाग म्हणून शाळा तपासणी तथा बाह्यमूल्यमापन सामारोप प्रसंगी विद्यालयातील सर्व विभाग प्रमुख व शिक्षकांना मार्गदर्शन करताना शाळा सिद्धी बाह्य राज्यनिर्धारक श्री. देविदास कोरे म्हणाले, की अंबाजोगाई येथील श्री. खोलेश्वर माध्यमिक विद्यालयातील विविध उपक्रम विद्यासभा अंतर्गत चालतात हि स्तुत्य बाब असून त्यामुळे विद्यार्थी विकासाला संधी मिळते व विद्यार्थ्यांची गुणवत्ता सातत्याने वृदिंगत होवून विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेख उंचावतो. याप्रसंगी मंचावर भा.शि.प्र.संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. विनायकराव पोखरीकर, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री शशिकांतराव टेकाळे, मुख्याध्यापक श्री. संतोषराव देशमुख, उपमुख्याध्यापक अनंतराम कोपले, शिक्षक प्रतिनिधी पिंपळे सर, पर्यवेक्षक अरूण पत्की उपस्थित होते.
         पुढे बोलताना कोरे म्हणाले, की तपासणी करताना शिक्षकांनी आपआपल्या विभागातील अहवाल लेखी स्वरूपात अद्यावत ठेवले असून ही उल्लेखनीय बाब असल्याचे मत व्यक्त केले. विद्यालयातील मूल्यमापन, क्रीडाविभाग, विज्ञान प्रयोग शाळा, ग्रंथालय, संगीत, चित्रकला, शालेय पोषण आहार, एन एन सी , स्पर्धा परीक्षा, कार्यालयीन व प्रसिध्दी विभाग इत्यादी विभागाची तपासणी केली असता विद्यालयातील उपक्रमांची दिशा विद्यालयाचा दर्जा दर्शविते या शब्दात विद्यालयात राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचा त्यांनी गौरव केला.
विजेचा स्वतःचा सौर ऊर्जा प्रकल्प राबून हि शाळा आपला एक वेगळा ठसा व आदर्श राज्यापुढे निर्माण करत आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून विवेक ग्राम दत्तक योजना अंतर्गत अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी गाव या शाळेने पंधरा वर्षासाठी दत्तक घेऊन वृक्षारोपन व पाणी बचती संदर्भात जनजागृतीचे काम असो की आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलाच्या मोफत शिक्षणाची केली जाणारी सोय हि या शाळेची सामाजिक बांधिलकी उल्लेखनीय बाब असून केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे हे संस्थेचे ब्रीद आपल्या क्रातीयुक्त योगदानातून हि शाळा पूर्ण करत असल्याचे मत श्री. कोरे यांनी व्यक्त केले. व संस्थेने मुलांना शुद्ध पाणी पुरवठ्याची योजना कार्यान्वित करण्याची या प्रसंगी संस्था पदाधिकाऱ्यांना सूचना केली.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थीनी पार्श्वगायिका ऋचा कुलकर्णी, उत्तम वक्ता असलेली भक्ती देशपांडे , एन एन सी कँप मधिल गोल्ड मेडल प्राप्त करणारे रोहण सांगळे व प्रविण तिडके या विद्यार्थ्यांचे कोरे यांनी पुष्पगुछ देऊन त्यांचे अभिनंदन केले. व पुढे शाळा सिद्धी राज्य निर्धारक देविदास कोरे यांनी विद्यालय 'अ' श्रेणीत असल्याने राष्ट्रीय स्तरावरील तपासणीस विद्यालयाने अधिक सज्ज रहावे व शाळेला 'अ' श्रेणी कायम रहावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोपात शशिकांतजी टेकाळे यांनी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, कर्मचा-यांचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वर्षात शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी अधिकाधिक परिश्रम घेतले जातील व या विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न केले येतील तसेच तात्काळ शुद्ध पाणीपुरवठ्याची व्यापक योजना शाळेत सुरू केली जाईल अशी या प्रसंगी ग्वाही दिली. या वेळी सर्व विभाग प्रमुख, शिक्षक बंधू भगिनी यांची उपस्थिती होती.
समारोप प्रसंगी अंबाजोगाई येथील श्री. खोलेश्वर विद्यालयातील उपस्थित सर्व विभाग प्रमुख व शिक्षक ....