निलंगा:-
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत सिंदीजवळगा ता. निलंगा येथील जयहिंद विद्यालयाचा निकाल ९३.०२ टक्के लागला आहे. विद्यालयातील कृष्णा संजीव सिरसल्ले याने ९०.६० टक्के गुण घेऊन केंद्रात दुसरा तर विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळवला. तसेच वर्षा बालाजी धुमाळ हिने ८७. ४० टक्के गुण घेवून शाळेतून द्वितीय व वेष्णवी रंगराव धुमाळ हिने ८४. ८० टक्के गुण घेवून तृतीय येण्याचा मान मिळवला. याबरोबरच ज्योती गंगाधर हराळे हिला ८४ टक्के तर आरती युवराज धुमाळ हिला ८३.८० टक्के गुण मिळाले. विद्यालयातून विशेष प्राविण्यासह दहा, प्रथम श्रेणीत आकरा व द्वितीय श्रेणीत एकोणीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. शाळेने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली असून यशस्वी विद्यार्थ्यांचे आभिनंदन कार्याध्यक्ष वसंतराव पाटील, मुख्याध्यापक देविदास कोरे, पालक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे.
कृष्णा सिरसल्ले वर्षा धुमाळ वेष्णवी धुमाळ ज्योती हराळे आरती धुमाळ
९०. ६० ८७. ४० ८४. ८० ८४. ०० ८३. ८०