निलंगा :-
लातूर जिल्हा विभागीय क्रीडा कार्यालयाच्या वतीने सन २०१४ - १५ या शेक्षणिक वर्षात क्रीडा संकुल येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या १४ वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय शालेय योगा क्रीडा स्पर्धेत सिंदीजवळगा ता. निलंगा येथील जयहिंद विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत असलेला विद्यार्थी सुमित समिंदर माने याने लातूर जिल्हास्तरीय शालेय योगा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला असून त्याची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे. त्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक देविदास कोरे सहशिक्षक एस. बी. परिहार, एस. व्ही. पवार क्रीडा शिक्षक एस. व्ही. तारे यांनी त्याचे आभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment